Chicken Mutton washing tips and tricks : चिकन किंवा मटण आणि इतर कोणत्याही पद्धतीचं मांस म्हणजे प्रथिनांचा (Proteins) एक उत्तम स्त्रोत. चिकन- मचणचे पदार्थ (Chicken Mutton) आवडत नाहीत असं म्हणणारे फार क्वचितजण तुम्हाला ठाऊक असावेत. असो, इथे मुद्दा आहे चिकन, मटणचा. उद्या रविवार. अनेकांच्याच सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हटलं की मस्तपैकी उशिरा उठणं आणि आवडत्या जेवणावर ताव मारणं आलंच. आता हे आवडतं जेवण कोणतं, तर बरेचजण उत्तर देतील चिकनचा बेत असणारं. तुम्हीही असाच बेत आखताय का? आखत असाल तर, आधी ही बातमी वाचा. कारण, चिकन किंवा मटण शिजवण्यापूर्वी तुम्हीही ते थेट नळाच्या पाण्यानं स्वच्छ करत असताल तर थांबा. (is washing chicken mutton beneficial or not know details)


चिकन किंवा मटण वाहत्या / नळाच्या पाण्याखाली स्वच्छ करणं योग्य की अयोग्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च मांस मग ते कोणत्याही प्रकारचं असो त्यावर असंख्य बॅक्टेरिया असतात. ज्यामुळं campylobacter आणि  salmonella यांसारखे आजार उदभवू शकतात, असं Centers for Disease Control and Prevention (CDC) चं म्हणणं आहे. ज्यावेळी तुम्ही मांसाचा तुकडा नळाखाली धरता तेव्हा तो स्वच्छ करत असताना त्याचं पाणी नकळतपणे इतरत्र उडण्याची दाट शक्यता असते. हे इतक्यावरच थांबत नाही. हे पाण्याचे थेंब जेवणाचा ओटा, शेगडी, भांडी घासायचा साबण आणि तिथं असणाऱ्या इतर वस्तूंवरही उडू शकतात ज्यावाटे हे बॅक्टेरिया (Bacterial infection) आपल्या शरीरात प्रवेश करण्याच्या वाटा तयार होतात. 


विश्वास बसणार नाही, पण अभ्यासकांच्या मते ज्या सिंकमध्ये तुम्ही मांस स्वच्छ करता तिथून तीन फुटांच्या अंतरापर्यंत हे बॅक्टेरिया सहजपणे पसरू शकतात. गेली अनेक वर्षे तुम्ही कोणत्याही गोष्टीचं भान न ठेवता चिकन- मटण स्वच्छ करताय तर, तुम्ही नशीबवानच समजा. 


या चुका करू नका


बहुतांश लोकांना चिकन- मटण स्वच्छ करताना होणाऱ्या या चुकांची माहिती नसते. पण, या कृती ही माहिती जाणूनही न थांबल्यास पोटदुखी, ताप, अतिसार, पोटदुखी, उलट्या आणि तत्सम काही व्याधींना बोलावणं धाडू शकते. किंबहुना गरोदर महिलांनी तर, कच्चं मांस पाण्यानं धुताना विशेष काळजी घ्यावी. 


चिकन, मटण किंवा इतर कोणतंही मांस स्वच्छ करताना ते स्वयंपाक शिजवण्याच्या जागेपासून दूर स्वच्छ कराल याची कायम काळजी घ्या. अनेकदा या गोष्टीसुद्धा शक्य होत नाहीत. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. 


- किचनचा ओटा आणि सिंक स्वच्छ ठेवणं. 
- सर्व गोष्टी कापण्यासाठी एकाच चॉपिंक बोर्डचा वापर न करणं. 
- ज्या सुरीनं मांस कापलं आहे ती व्यवस्थित स्वच्छ करणं, हीच प्रक्रिया मांस स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या भांड्यांसोबतही करावी. 
- मांस फ्रिजमध्ये ठेवायचं झाल्यास ते ठराविक तापमानावर Freez करावं. 
- शक्य असल्यास चिकन वाहत्या पाण्याऐवजी एखाद्या भांड्यात पाणी घेऊन स्वच्छ करावं आणि ते पाणं अजिबात इथेतिथे न हात लावता फेकून द्यावं. 
- शक्य असल्यास चिकन किंवा इतर प्रकारचं मांस हळद- मीठ लावून वाफवून ठेवावं. जशी गरज भासेल तरा त्याचा वापर करावा.
- मांस फ्रिजरमधून बाहेर काढल्यानंतर त्याचं पाऊच किंवा कंटेवर जेवणाच्या ओट्यावरच सर्वसामान्य तापमानावर येण्यासाठी ठेवू नका. त्याऐवजी एखाद्या भांड्याच पाणी घेऊन त्यात थंड मांस ठेवा. ते Normal Temprature वर येताच गरजेनुसार वापर करा.