मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा हिचे आज राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न होत आहे. ती  आनंद पिरामल सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. इशा अंबानीच्या संगीत पार्टीसाठी मुकेश अंबानी यांनी हिलरी क्लिंटन यांना आमंत्रण दिले होते. त्या या कार्यक्रमासाठी रविवारी उदयपूर येथे दाखल झाल्या होत्या. हिलरी क्लिंटन अशा काही थिरकल्यात की त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अमेरिकेच्या माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन. त्यांचीही खास उपस्थिती नजरेत भरणारी होती. विवाह सोहळ्याच्यावेळी अनेकांनी हिंदी गाण्यावर ठेकाही धरला होता. यावेळी हिलरी याही बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकल्यात. त्यांच्या सोबत अभिनेता शाहरुख खानही होता. 



 
इशाच्या लग्नाच्या विधी गेल्या आठवड्याभरापासून सुरू होत्या. तिच्या संगीतच्या कार्यक्रमात देशविदेशातून कलाकार, नेतेमंडळी, खेळाडू सहभागी झाले होते. या सोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी एक आहे तो अमेरिकेच्या नेत्या आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांचा. त्या बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत.



या कार्यक्रमात संपूर्ण बॉलिवूड सहभागी झाले होते. यावेळी हिलरी देखील ‘तुने मारी एंट्री’या, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यांवर नाचताना दिसल्या. त्यांच्यासोबत शाहरुख खान, आमीर खान, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देखील नाचताना दिसत आहेत. यावेळी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी डान्स करताना दिसत आहेत.