Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये पेटलेलं युद्ध आता गंभीर रुप घेतंय. दोन्ही बाजूंनी जरोदार हवाई हल्ले केले जात असून या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानीदेखील झाली आहे. गाझा पट्टीवरुन हमासकडून (Hamas) इस्त्रायलवर (Israel) रॉकेट्स डागण्यात आले. यानंतर इस्त्रायलने युद्धाची (War) घोषणा केली आहे. हमासने 20 मिनिटात 5000 रॉकेट इस्रायलवर डागले. याला उत्तर म्हणून इस्त्रालयनेदेखील हवाई हल्ले सुरु केले असून गाझा पट्टीतील काही नागरिक यात मारले गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-इस्त्रायल व्यापार संबंध
भारत आणि इस्त्रायलमध्ये चांगले व्यापार संबंध आहे. भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांनीही इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. वास्तविक इस्त्रायलमध्ये अनेक भारतीय नागरिक राहातात आणि त्यांनी अनेक व्यवसायांचा विस्तार केला आहे. भारत आणि इस्त्रायलमध्ये सुरुवातीला 5 बिलियन डॉलरचा व्यवसाय होता. तो वाढून आात 7.5 बिलियन डॉलर म्हणजे 6 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. मुख्यत्वे हिरे, पोर्ट आणि शिपिंग क्षेत्रात भारताची गुंतवणूक आहे. 


अदानी समुहाची गुंतवणूक
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी इस्त्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी गौतम अदानी यांची कंपनी अदानी पोर्ट्सने एक टेंडर जिंकलं होतं. हे टेंडर तब्बल 1.8 बिलियन डॉलरचं होतं. अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन तसंच इस्रायली कंपनी गॅडोट ग्रुप यांच्यात करार झाला. या दोन कंपन्यांनी मिळून हाइफा बंदराच्या खासगीकरणाची निविदा जिंकली. यात गौतम अदानी यांच्या कंपनीची हिस्सेदारी जवळपास 70 टक्के असल्याचे सांगितले जातं.  हाइपा हे बंदर इस्रायलचे शिपिंग कंटेनर्समधील सर्वात मोठे बंदर मानलं जातं. 


हिरे व्यवसायावर परिणाम
पोर्ट आण शिपिंग व्यतिरिक्त भारत आणि इस्त्रायलमध्ये हिरे व्यवसायाचाही करार आहे. एका अहवालानुसार दोनही देशात जवळपास 20 कोटी डॉलरचा हिरे व्यवसाय आहे. 


भारतातवर काय परिणाम होतील?
इस्त्रायल आणि हमास यांत्यातील युद्ध बराच काळ लांबलं तर त्याचे भारतसह जगभारातील देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध पश्चिन आशियापर्यंत पोहोचलं तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर त्याचे परिणाम जाणवतील. महागाई आणि जागतिक बाजारातील आर्थिक अस्थिरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला आणखी मंदीचा सामना करावा लागू शकतो. याचा भारतीय चलनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.