SPADEX Space Docking Experiment :भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO जगातील सर्वात मोठा प्रयोग करणार आहे. ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे. भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक होईल अशी ही मोहिम आहे. लकरच  SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मिशन अंतर्गत हा प्रयोग केला जाणार असल्याची घोषणा इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केली आहे. 
चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोच्या टीमने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 3 पेक्षा चांद्रयान 4 ही मोहिम अत्यंत वेगळी असणार आहे. चांद्रयान 4  स्पेसक्राफ्टचे पार्ट हे थेट आकाशात जोडले जाणार आहेत. भारताची नवी टेन्कॉलीजी पाहून संपूर्ण जग अचंबित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी मिशन चांद्रयान 4 बाबत माहिती दिली. चांद्रयान 4 इस्रो पहिल्यांदाच असा प्रयोग करणार जो जगभरात यापूर्वी कधीही झालेला नाही असे सोमनाथ यांनी सांगितले.   चांद्रयान 3 प्रमाणे चांद्रयान 4 हे एकावेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान 4 हे दोनदा प्रक्षेपित केले जाणार आहे. म्हणजेच चांद्रयान 4 चे दोनदा लाँचिग केले जाणार आहे. दोनवेळा वेगवगेवळे पार्ट अवकाशात प्रक्षेपित केले जातील.  चांद्रयान 4 चे स्पेसक्राफ्टचे पार्ट हे आकाशात किंवा लँडिगवेळी चंद्रावरच एकमेकांना जोडले जातील. जगात प्रथमच मून मिशनसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारा भारत हा पहिला देश आहे.


चांद्रयान 4 मोहिमेची तयारी म्हणून  SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे.   15 डिसेंबर 2024 रोजी हे मिशन लाँच केले जाण्याची शक्यता आहे.  चांद्रयान 4मोहिमेसाठी वापरले जाणारे स्पेसक्राफ्ट हे अत्यंत शक्तीशाली आहे. एकावेळी चांद्रयान 4 अवकाशात प्रक्षेपित करता येईल असे शक्तीशाली रॉकेट भारताकडे नाही. यामुळेच चांद्रयान 4 हे दोन पार्टमध्ये अवकाशात प्रक्षेपित करुन ते अंतराळातच असेंबल केले जाणार असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले


स्पेस स्टेशनसाठी होणार फायदा


लवकरत अंतराळात भारताचे स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. चांद्रयान 4  साठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची मदत इस्त्रोला स्पेस स्टेशन उभारणीसाठी होणार आहे. ज्याप्रमाणे च चांद्रयान 4 हे दोन पार्टमध्ये अवकाशात प्रक्षेपित करुन ते अंतराळातच असेंबल केले जाणार त्याचप्रमाणे स्पेस स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. अशाच प्रकारे वेगवेगळे पार्ट जोडून अंतराळात स्पेस स्टेशन उभारले जाणार आहे.


भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी


14 जुलै 2023 रोजी चंद्राकडे झेपावलेले चांद्रयान 3 हे   23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर लँड झाले. तब्बल 14 दिवस चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे.