ISRO Launch LVM3 Rocket : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने  (Indian Space Research Organisation - ISRO) पुन्हा एकदा नवा इतिहास रचला. ISRO ने श्रीहरितकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 36 उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे LVM3 Rocket प्रक्षेपित केले आहे. रविवारी (26 मार्च) सकाळी 9 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 LVM3- M3 हे इस्त्रोते हेवी लिफ्ट रॉकेट असून पाठवलेल्या सर्व 36 उपग्रहांचे एकूण वजन 5805 किलो आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असे नाव देण्यात आले आहे.  दुसर्‍या लॉन्चपॅडवरून ते टेक ऑफ झाले. या लॉन्च पॅडने चांद्रयान-2 मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी प्रक्षेपण केले आहेत. चांद्रयान-2 मोहिमेसह LVM3 वरून सलग पाच यशस्वी मोहिमा प्रक्षेपित केल्या आहेत. त्याचे हे सहावे उड्डाण आहे. ब्रिटनच्या नेटवर्क ऍक्सेस असोसिएट्स लिमिटेड (OneWeb) ने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी करार केला आहे.     



इस्रोची व्यावसायिक एकक असलेल्या न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार हे 36 उपग्रह अवकाशात वाहून नेण्यात आले. Gen1 उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवण्यात आले आहेत. OneWeb साठी ISRO च्या व्यावसायिक युनिट NewSpace India Limited (NSIL) चे हे दुसरे मिशन असेल. नेटवर्क अॅक्सिस असोसिएटेड लिमिटेड म्हणजेच वनवेब ही यूके स्थित कम्युनिकेशन कंपनी आहे. त्याची मालकी ब्रिटीश सरकार भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्यूजेस नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हानव्हा यांच्याकडे आहे. ही उपग्रह आधारित सेवा देणारी एक संपर्क कंपनी आहे. त्याचे मुख्य कार्यालय लंडनमध्ये आहे.



ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सर्वत्र उपलब्ध असेल


OneWeb चे 36 उपग्रह 16 फेब्रुवारीलाच फ्लोरिडाहून भारतात आले. OneWeb India-2 अंतराळातील 600 पेक्षा जास्त कमी पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचे नक्षत्र पूर्ण करेल. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात स्पेस आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरविण्याच्या योजनेत मदत होईल.


निम्न पृथ्वी कक्षा ही पृथ्वीची सर्वात खालची कक्षा


लो अर्थ ऑर्बिट ही पृथ्वीची सर्वात खालची कक्षा आहे. त्याची उंची पृथ्वीभोवती 1600 किमी ते 2000 किमी दरम्यान असेल. या कक्षेतील वस्तूचा वेग ताशी 27,000 किलोमीटर आहे. यामुळेच 'लो अर्थ ऑर्बिट'मधील उपग्रह वेगाने फिरतो.