चेन्नई :#PSLVC45 मिशन शक्तीनंतर भारत आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी तयार झाला असून, नुकतच श्रीहरिकोटा येथे त्याचा प्रत्यय पाहा.ला मिळाला. सोमवारी सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी . ज्यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-४५ ने अंताराळात झेप घेतली. यासोबत इतर २८ उपग्रहसुद्धा अंतराळात सोडण्यात आले. एमिसॅट अर्थात EMISAT या उपग्रहासोबतच काही परदेशी उपग्रहांचंसुद्धा प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएसएलव्ही सी-४५ EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण २९ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं.  यात अमेरिकेचे २४, भारताचा १, ल्युनिनियाचे २, स्वित्झर्लंडचा १ आणि स्पेनचा १ अशा उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.. यातील EMISAT  हा उपग्रह भारतासाठी खास असणार आहे कारण या उपग्रहाच्या सहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळणार आहे.


पीएसएलव्ही C45 हे एक हा एक असा उपग्रह आहे, जो त्याच्या चौथ्या रॉकेट स्टेजमध्ये (PS4) सोलर पॅनलचा वापर करणार आहे. यामध्ये एकूण तीन पेलोड्स आहे. ज्यामध्ये ऍमसॅट अर्थात (रेडिओ ऍमॅच्युअर सॅटेलाईट कॉर्पोरेशन)ची ऑटोमॅटीक रिपोर्टींग सिस्टीम (APRS), इस्रोची ऑटोमॅटीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम आणि भारतीय अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या अद्ययावत रिटार्डींग पोटेंशिअल ऍनालायझर (ARIS) चा समावेश आहे. 



पीएसएलव्ही मालिकेतील हे ४७ वं मिशन ठरलं आहे. सर्वप्रथम एमिसॅट अंतराळात  ७४९ किमीच्या कक्षेत प्रक्षेपित केला जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित २८ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी ५०४ किमी अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याचं कळत आहे. उपग्रह प्रक्षेपणाच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण १८० मिनिटांचा कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.