Chandrayaan-2 : अंतराळात भारताचे पाऊल, चौथ्यांदा कक्षा बदलण्यात यश
चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
बंगळुरु : चांद्रयान-२ यानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. आज चांद्रयान-२ ने चौथी कक्षा (orbit) यशस्वी पार केली आहे. दरम्यान, श्रीहरिकोटा येथून २२ जुलै रोजी चांद्रयान-२ अवकाशात झेपावलेले होते. या यशस्वी वाटचालीमुळे हे यान नियोजीत कालावधी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल, असे इस्त्रोने म्हटले आहे. याबाबद ट्विटही केले आहे.
चांद्रायान -२ हे २२ जुलै २०१९ रोजी दुपारी २.४३ वाजता अवकाशात झेपावले. चंंद्रयान-२ हे ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. दरम्यान, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी २६ जुलै रोजी सकाळी चांद्रयान-२ ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. चांद्रयान-२ ची कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता. तर तिसरा टप्पा २९ जुलै रोजी होता. याही टप्प्यात यश मिळाले. चांद्रयान-२ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना यश येत आहे. आज चौथ्या टप्प्यात यश मिळाले आहे.
चंंद्रयान-२ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले आहे. चंंद्रयान-२ अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान १७० किमी आणि कमाल ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिर करण्यात आले होते. चंंद्रयान-२ चा प्रवास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून देण्यात आली आहे.
चंंद्रयान-२ चा दुसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता पुढच्या काही दिवसांत आणखी तीन वेळा चंंद्रयान-२ च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चंंद्रयान-२ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चंंद्रयान-२ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे.