मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख जवळ आलीय. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत  म्हणजेच ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरणे आवश्यक असणार आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढू शकते. हे जरी दरवर्षी होत असले तरी, शक्य तितक्या लवकर ITR दाखल करणे शहाणपणाचे लक्षण असणार आहे. मात्र त्याहून शहाणपणाचं लक्षण हे असणार की तुम्ही 10 किंवा 10.5 लाखाच्या सॅलरीवर 1 रुपया देखीव टॅक्स भरावा लागणार नाही. ते कसे यासाठी तुम्हाला हे गणित समजून घ्यावे लागेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10.5 लाखांच्या पगारावर तुम्ही 30 टक्के कराच्या स्लॅबमध्ये येतो. कारण 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर भरावा लागतो. त्यामुळे या करातून तुम्ही तूमची अशी सुटका करू शकता


संपूर्ण गणित वाचा


1. जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर आधी सरकारने दिलेले 50 हजार स्टँडर्ड डिडक्शन म्हणून कापून घ्या. अशा प्रकारे तुमचे करपात्र उत्पन्न आता १० लाख रुपये झाले आहे.


2. आता तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा दावा करू शकता. यामध्ये तुम्ही मुलांची शिकवणी फी, PPF, LIC, EPF, म्युच्युअल फंड (ELSS), गृहकर्जाचे मुद्दल इत्यादींचा दावा करू शकता. अशा प्रकारे तुमचे करपात्र उत्पन्न येथे 8.5 लाख रुपये झाले आहे.


3. तुम्हाला 10.5 लाखांच्या पगारावर कर शून्य (0) करण्यासाठी 80CCD(1B) अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत 50 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुमचा करपात्र पगार रु.8 लाखांवर आला आहे.


4. आता आयकराच्या कलम 24B अंतर्गत, तुम्ही 2 लाख रुपयांच्या गृहकर्जाच्या व्याजावर कर सूट मागू शकता. अशा प्रकारे, आता तुमचे करपात्र उत्पन्न 6 लाख रुपयांवर आले आहे.


5. आयकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी (पत्नी आणि मुलांसाठी) 25 हजार रुपयांच्या वैद्यकीय आरोग्य विम्याचा दावा करू शकता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी ५० हजारांचा दावा करू शकतात. एकूण 75 हजारांचा आरोग्य विमा प्रीमियम क्लेम केल्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न 5.25 लाखांवर आले आहे.


6. आता तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला 25 हजार रुपये कोणत्याही संस्थेला किंवा ट्रस्टला दान करावे लागतील. तुम्ही त्यावर आयकर कलम 80G अंतर्गत दावा करू शकता. 25 हजार दान केल्यावर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाखांवर आले.


 शून्य कर 
आता तुमचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपये झाले आहे. 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने तुमचा कर 12,500 रुपये होतो. मात्र सरकारकडून या उत्पनावर सुट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला एक रुपयाचाही कर द्यावा लागणार नाही.