आयकर रिटर्न फाइल करा आणि जिंका Royal Enfield! 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी, जाणून घ्या डिटेल्स
सरकारच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कॉमन सर्विस सेंटरचे VLE जर 31 डिसेंबरपर्यंत 1000 हून अधिक रिटर्न फाइल करीत असतील. तर त्यांना एक रॉयल एनफिल्ड ही बाईक जिंकण्याची संधी आहे.
मुंबई : सरकारच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कॉमन सर्विस सेंटरचे VLE जर 31 डिसेंबरपर्यंत 1000 हून अधिक रिटर्न फाइल करीत असतील. तर त्यांना एक रॉयल एनफिल्ड ही बाईक जिंकण्याची संधी आहे.
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. रिटर्न भरण्यासाठी मोजके दिवस शिल्लक आहे. रिटर्न फाइल करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स जारी करीत असते. अशीच एक ऑफर इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने दिली आहे. ज्यामध्ये कॉमन सर्विस सेंटरला 1000 हून अधिक रिटर्न फाइल करण्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारतर्फे कार्यरत असलेल्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये काम करणाऱ्या विलेज लेवर एंटरप्रेन्योर (VLE)यांच्यासाठी भन्नाट ऑफर सरकारने जारी केली आहे. त्यांना कमीत कमी 1000 रिटर्न 31 डिसेंबर पर्यंत फाइल करायचे आहेत. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने रॉयल एनफिल्ड जिंकण्याची संधी दिली आहे.