Jagannath Puri Temple : भारतात धार्मिक पर्यटनासाठी येथील मंदिर शिल्पकलेचे योगदान (Temple  great sculpture) वाखाणण्यासारखे आहे. भारतात असं एकही ठिकाण नाही जेथे धार्मिक स्थळ आढळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मंदिराचा स्वतःचा इतिहास आहे. काही मंदिर तर असे आहेत, ज्याचा इतिहास मंदिर (history of indian Temple  great temple) स्थापन होण्याच्या पूर्वीपासून चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे मंदिर बांधण्यापूर्वी जागेचा वातावरण आणि इतर नैसर्गिक बाबींचा तपास केला जतो. त्यानंतर भव्य मंदिराची स्थापना केली जाते. ( story of jagannath puri temple)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिराची निर्मिती करताना तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड दिली जाते. पण परकीय अक्रमनांमुळे अनेक जुन्या मंदिरांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. अशाच एका मंदिरांपैकी एक म्हणजे जगन्नाथपुरी मंदिर. ओरिसामधील जगन्नाथपुरी मंदिर 900 हून जुनं आहे. (puri jagannath temple history)


मंदिराची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगन्नाथपुरी मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या उलट्या दिशेन फडकतो आणि पक्षी मंदिराच्या परिसरात फिरकत देखील नाहीत. मंदिर बांधण्यासाठी जागा निवडताना अनेक गोष्टींता आभ्यास केला. (mystery of jagannath puri temple)


जगन्नाथ मंदिराच्या भोवती अनेक रहस्यं गुंफली आहेत. मंदिराच्या कळसावर असलेला ध्वज वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो. एवढंच नाही तर मंदिरावरून काहीच उडत नाही. ह्या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत किंवा मंदिराच्या शिखराचा आसरा घेत नाहीत. तसेच ह्या मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. 


दिवसाची कोणतीही वेळ घेतली तरी ह्याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. यामागे चमत्कार असल्याची लोकांचा समज आहे. पण हा चमत्कार वैगरे काहीही नसून मंदिर बांधण्यामागील तंत्रज्ञान ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. 


जगन्नाथपुरी मंदिराचं शिखर थोडाफार गोलाकार स्वरुपात बनवलं आहे. त्यामुळे मंदिराचा आकार ध्वज उलट्या दिशेने फडकण्याचं मुख्य कारण आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे 'कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट' बघायला मिळतो.


मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडत नसावेत असा एक अंदाज वर्तवण्याच आला आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. (jagannath mandir great sculpture)


कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येत असावी असं सांगण्यात येतं. एकंदरित मंदिरातील अनेक गोष्टी लक्षात घेतल्यानंतर मंदिर उभारताना उच्च तंत्रज्ञानचा वापर केल्याचं कळतं. (jagannath mandir)