शेतकरीपुत्र ते उपराष्ट्रपती! Jagdeep Dhankhar यांच्याबद्दल जाणून `या` खास गोष्टी
उपराष्ट्रपतीपदाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी या जाट नेत्याला एका शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून संबोधलं.
Jagdeep Dhankhar: पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी 2019मध्ये जेव्हा जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांची नियुक्ती झाली होती तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर शनिवारी जेव्हा त्याची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती (Vice President Election 2022 ) झाली तेव्हा सर्वांच आश्चर्यचकित झाले. धनखर यांना निवडणुकीत 528 मतांनी विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना 182 मतं पडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल होण्यापूर्वी ते एक प्रसिद्ध वकील होते. राजस्थानमधील जाट समाजाला ओबीसी दर्जा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जगदीप धनखर हे 11 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. (jagdeep dhankhar journey from rajasthan village to vice president house in marathi)
जगदीप धनखर हे क्रीडाप्रेमी
जगदीप धनखर यांचं शालेय जीवन खूप कष्टाचं होतं. त्यांना सरकारी शाळेत जायला 4-5किलोमीटर रोज पायपीट करावी लागायची. शालेय जीवनापासूनच त्यांना क्रिकेटचं वेड होतं.धनखर हे राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते. तसंच त्यांचा अध्यात्माकडेही कल होता. धनखर यांचा उपराष्ट्रपती नियुक्तीनंतर आता लोकसभा आणि राज्यसभेतील पीठासीन अधिकारी राजस्थानचे असतील, जिथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
धनखर यांचा राजकीय प्रवास
उपराष्ट्रपतीपदाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी या जाट नेत्याला एका शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून संबोधलं. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शेवटची अखिल भारतीय बैठक धनखर यांच्या मूळगावी झुंझुनू या गावी झाली होती. जगदीश धनखर हे त्या काळात इतर जाट नेत्यांप्रमाणे देवीलाल यांच्यावर आपली छाप पाडत होते. 1989 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या झुनझुनू संसदीय मतदारसंघातून त्यांनी विरोधी उमेदवार म्हणून संधी देण्यात आली. तेव्हापासून धनखर हे तरुण वकील यांचा प्रवास राजकीय मार्गावर पुढे जायला लागला आणि धनखर विजयी झाले. त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
वसुंधरा राजेंचे जवळचे व्यक्ती
1990 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर पीव्ही नरसिंग राव पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जेव्हा राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचा प्रभाव वाढल्यानंतर धनखर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर वसुंधरा राजेंच्या जवळील लोकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. त्यानंतर धनखर प्रसिद्धीच्या झोतात आले.
धनखर शेतकरीपुत्र
जगदीश धनखर यांचा जन्म राजस्थानमधील झुंझूनू जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील शेतकरी कुटुंबात झाला. धनखर यांचं शालेय शिक्षण हे चित्तौडगडमधील सैनिक स्कूलमध्ये झाले. भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केलं. त्यानंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिसही केली.
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एका दुर्गम गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखरने चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनखर यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि देशातील सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.