नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचारावर ओवेसी यांनी प्रतिक्रिय़ा दिली आहे. जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाने जोर पकडला आहे. आता AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवेसींचा अमित शहांवर निशाणा


ओवेसी म्हणाले की, 'अमित शाह जेव्हापासून गृहमंत्री झाले आहेत, तेव्हापासून दिल्लीत संघर्षाच्या घटना सामान्य झाल्या आहेत. या पिस्तुलधारकांवर 'आर्म्स ऍक्ट' लावला जाणार नाही का? तुमच्या पोलिसांनी 14 जणांना अटक केली असून, ते सर्व मुस्लीम आहेत.



'दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका'


ते म्हणाले की, 'दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एवढा अहंकार आहे की ते गुन्हेगाराचे नाव सांगू शकत नाहीत, जे मिरवणुकीत बंदुका आणि पिस्तूल घेऊन फिरतात त्यांच्या विरोधात ते तोंड उघडत नाहीत. मशिदींची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाचा निषेध नाही. प्रेम आणि प्रेमाची चर्चा तेव्हाच चांगली होते जेव्हा न्याय असेल, न्यायाशिवाय बंधुभाव शक्य नाही.