मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडी आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी ईडीमार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखला जात आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी ईडी काम करतंय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंआहे.


दरम्यान, लेटरबॉम्बनंतर संजय राऊत यानी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी अवघ्या दोन ओळीत विरोधकांना इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये वाघाचा फोटो त्यांनी शेअर केला असून 'झुकेंगे नही, जय महाराष्ट्र' असं लिहिलं आहे. अवघ्या दोन ओळीत संजय राऊत यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.



'मविआ नेत्यांना धमकी दिली जाते'
आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही. मी ईडी कार्यालयाबरोबर पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले. (Sanjay Raut's serious warning to BJP)


माझं पत्र ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाला बदनाम करायचं चालले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी ईडीचे लोक पाच दिवस जाऊन बसले. ईडी म्हणते की या नेत्याचं नाव घ्या त्या नेत्याचं नाव घ्या. महाविकास आघाडीतील सर्वजण एकत्र आहोत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. केंद्रीय यंत्रणा विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं, असे ते म्हणाले.