नवी दिल्ली : हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जयराम ठाकूर यांनी घेतली. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. 


निवडणुकीआधी भाजपकडून प्रेमकुमार धुमल यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत धुमल यांचा पराभव झाल्यानं त्यांचं नाव मागे पडलं.