नवी दिल्ली : जैन मुनी विप्रन सागर महाराज यांनी फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भागलपूर जिल्ह्यातील चंपानगर येथील श्री दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र मंदिरात त्यांचं शरीर पंख्याला लटकताना दिसलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून चौकशी सुरु केली आहे. भागलपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या खोलीत एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये त्यांनी कोणत्या तरी गोष्टीमुळे चिंतेत असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जैन मुनी विप्न सागर जेवणानंतर 12:30 वाजता साधना करण्यासाठी गेले. संध्याकाळी साडे चार वाजता ते भाविकांना भेटतात. पण ते खोलीतून बाहेर न आल्याने नंतर गार्डने दरवाजा तोडला तर सगळ्यानाच धक्का बसला.


जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा जैन मुनींचं शरीर पंख्याला लटकलेलं होतं. यानंतर लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.  पोस्टमॉर्टमसाठी साध्वी आणि भाविकांनी विरोध केला. पण पोलिसांनी समजावल्यानंतर त्यांचं शरीर रुग्णालयात पाठवण्यात आलं.