त्याच्या अंडरपँटमध्ये सापडलं 1.40 कोटींचं सोनं! विमानतळावर एकच खळबळ, अधिकारीही चक्रावले
Gold Smuggling In Underpant: या व्यक्तीसंदर्भात तपास यंत्रणांना शंका आल्याने त्याला थांबून चौकशी केली गेली. सुरुवातीला त्याने आपण असं काहीही करत नसल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Gold Smuggling In Underpant: सोन्याची किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रयत्नांसंदर्भातील अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असती किंवा वाचल्या असतील. तस्करीसाठी वेगवेळ्या कल्पना वापरणाऱ्यांकडून कितीही हुशारी दाखवण्यात आली तरी ते बऱ्याचवेळा तपास यंत्रणांच्या हाती लागतात. असाच एक प्रकार जयपूर अंतरराष्ट्रीय विमानतळावर समोर आला आहे. येथे शारजाहवरुन आलेल्या विमानातील एका प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयच्या म्हणजेच डीआरआयच्या एका टीमने अटक केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. हे सोनं या व्यक्तीने चक्क त्यांच्या अंतर्वस्रात लपवून आणलं होतं.
त्या व्यक्तीची शंका आली अन्...
शारजहावरुन एक विमान जयपूर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. नेहमीप्रमाणे डीआरआयच्या टीमने प्रवाशांची तपासणी सुरु केली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना एक व्यक्ती संक्षयास्पद वाटली. या व्यक्तीकडे पोलिसांनी तपास केला. या टीमने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण कोणत्याही प्रकारची तस्करी केलेली नाही असा दावाही त्याने केला.
पेस्ट बनवून सोनं तस्करीचा प्रयत्न
अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची झडती घेतल्यानंतर त्याच्या अंडरपॅण्टमध्ये आणि कंबरेजवळ सोनं बांधण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डीआरआयच्या टीमने त्यानंतर हे सोनं ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी या सोन्याचं वजन 2 किलो 700 ग्राम असल्याचं स्पष्ट झालं. हे सोनं पेस्ट बनवून आणण्याचा या तस्कराचा डाव डीआरआयच्या टीमने उधळला. मात्र हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 1 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे.
अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु
प्राथमिक तपासामध्ये तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला हा तरुण चूरु येथील रहिवाशी आहे. 2 वर्षांपूर्वी तो कामानिमित्त दुबईला गेला होता. मात्र परत येताना त्याला विमानतळावर सोन्याची डिलेव्हरी करायची होती. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. डीआरआयच्या टीमने शुक्रवारी या तरुणाला न्यायालयामध्ये हजर केलं असून पुढील तपास सुरु केला आहे. डीआरआयची टीम सध्या हा तरुण कोणाला सोन्याची डिलेव्हरी देणार होता याचा तपास करत आहे. नेमकी ही अशी तस्करी कधीपासून सुरु आहे? यामागे एखादी सक्रीय टोळी आहे का? या तरुणाने यापूर्वी अशी तस्करी केली आहे का? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध डीआरआयकडून घेतला जात आहे. तस्करीची अशी प्रकरण यापूर्वीही समोर आलेली आहेत.