नवी दिल्ली : भारतावर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संघटनेने वर्तवली आहे. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मोठा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडे आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जैश-ए-मोहम्मद मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० च्या तरतुदी हटवल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर आता राज्यात तणावपूर्व शांतता आहे. शांततेत बाधा आणण्याच्या शक्यतेने राजकीय नेते, कार्यकर्ते  आधी लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचा नेता सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कृत्यामुळे खोर्‍यात अशांतता निर्माण होऊ शकत असल्याने त्यांच्या अटकेचे आदेश मॅजिस्ट्रेटने दिले आहेत.


जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर जम्मू-काश्मीर, लडाख या ठिकाणी इंटरनेटसह अन्य बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारपासून खोर्‍यात तणावाचे वातावरण असून इंटरनेट सेवेसह रेल्वेसेवा बंद आहे.