जम्मू -काश्मीरमध्ये मोठी कारवाई, सुरक्षा दलाने चकमकीत 2 दहशतवाद्यांना केले ठार
जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे.
पुलवामा : जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir ) पुलवामामध्ये (Pulwama) आज शनिवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी (Terrorists) मारले गेले. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरु आहे. दचीगाम जंगलाजवळ ही चकमक झाली.
सुरक्षा दलांनी विशेष कारवाई
दहशतवाद्यांच्या लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि परिसराला वेढा घातला. त्याने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही. उलट त्यांनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले.
दहशतवाद्यांनी खोऱ्यात शांतता भंग केली
काश्मीर खोऱ्यात शांतता सुरु झाली असताना शांतता बिघडविण्याचे काम करत आहेत. दहशतवादी काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुरक्षा दल त्यांचे प्रत्येक षड्यंत्र उधळून लावत आहेत.
24 जुलै रोजी जम्मू -काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ही चकमक शोकबाबाच्या जंगलात झाली.