जम्मू : दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री राजौरी येथील भाजप नेते जसबीर सिंह (bjp leader Jasbir Singh) यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात जसबीर आणि त्याच्या कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी झाले. सर्वात दुःखद बाब म्हणजे या हल्ल्यामध्ये 2 वर्षाचा मुलाला आपला जीव गमवावा लागला. वीर सिंह असं या मुलाचं नाव होतं.  वीर सिंह हा जसबीर यांचा भाचा होता. जसबीर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या लाडक्या भाच्याने जगाचा निरोप घेतलाय, याबाबत त्यांना माहिती नाही. तसेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोटच्या मुलगा गमावल्याने वीरच्या आई स्वर्णा देवी यांचं मनोधेर्य खचंल आहे. त्या सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही. घरातील सर्वांचा लाडका असलेला वीर सोडून गेल्याने कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळलाय. या कुटुंबियांची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. (Jammu and Kashmir Khandli area A 2  year old was killed and 7 people  injured in  grenade attack on bjp leader Jasbir Singh's house)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा भास्कर जसबीरच्या घरी पोहोचला, तेव्हा कुटुंबीय वीरच्या पार्थिवाजवळ बसले होते. घरात आणि आसपासच्या भागावर शोककळा पसरली होती. "आमच्या मुलाने कोणाचं काय बिघडवलं होतं, त्याचा काय दोष होता? तो  उपाशी झोपलाय, वीरची आई त्याला आवडणारे बटाटा वेफर्स बनवायला गेली होती. त्याला उठवून वेफर्स खाऊ देण्याआधी हा हल्ला झाला. आमचा लाडका झोपत होता, तो झोपतच राहिला. आता तो कायमचा झोपी गेला", असं त्याची आत्या जोरजोरात रडत बोलत होती.  


आम्हाला न्याय द्या...


"माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला न्याय द्या. जर हे देशद्रोही स्वत: पुरुष समजतात, तर यांनी समोरुन वार करायचा होता, पाठीवर खंजीर का खूपसला, या लोकांनी आमचं कुटुंब संपवलं. आमच्या लाडक्या मुलाने जागीच जीव सोडला. आमच्या मुलासोबत काय वैर होतं. देवच न्याय करेल. आम्ही आमचा मुलगा गमावलाय", असंही वीरची आत्या म्हणाली.


संपूर्ण भागात सुरक्षा वाढवायला हवी. तसेच हल्ला झाला तेव्हा किती सुरक्षा होती, याचीही चौकशी करायला हवी, अशी मागणी जसबीरचा भाऊ बलबीर सिंह यांनी केली.