COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मिर :  जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग भागात पुन्हा एका सुरक्षारक्षकांवर दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईदचा नमाज अदा केल्यानंतर आंदोलकांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. शेकडो आंदोलकांनी केलेल्या या दगडफेकीला सैनिकांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.यावेळी सुरक्षारक्षकांनी बचावासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. तसेच एक जवान शहीद देखील झाला आहे. 


ईदच्याच दिवशी पाकिस्तानने जम्मूतल्या अरनिया आणि नौशेरा भागात गोळीबार झाला आहे. जगभरात सगळीकडे ईदचा उत्साह असताना मात्र पाकने आपले कृत्य सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन केले आहेय अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 हून अधिक दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांना निशाण्यावर घेतलं आहे. सीमेच्या पलिकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये नौशेरामध्ये एक जवान शहीद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शिपाई विकास गुरूंग असं या जवानाचं नाव आहे.