Jammu Kashmir News : मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती पाहता इथं प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी आर आर स्वॅन यांच्या माहितीनुसार सदर भागामध्ये दहशतवादी किंवा तत्सम कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या प्रत्येकाचीच आता खैर नाही. तणाव पसरवणाऱ्या कृत्यांना दुजोरा देत ही कृत्य करण्यास हातभार लावणाऱ्या प्रत्येकाविरोधात इथं अ‍ॅनिमी एजंट्स अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 


किती कठोर आहे हा कायदा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरचे डीजीपी स्वॅन यांच्या माहितीनुसार घुसखोरी करून काश्मीरमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या आणि दहशतवाद्यांना मदत करू पाहणाऱ्या घटकांविरोधा सक्त कारवाईची पावलं Anemy Agents Act अंतर्गत उचलली जाऊ शकतात. हा कायदा UAPA हूनही अधिक कठोर असल्याचं सांगितलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....


Anemy Agents Act अंतर्गत दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला आजीवन कारावाल किंवा मृत्यूदंडाचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या कायद्याविषयी बोलताना त्यांनी कठुआ दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भातील माहितीसुद्धा दिली. 


सदरील हल्ल्याचा तपास राज्यातील तपासयंत्रणेकडे सोपवण्यात आला असून, रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास आणि पुढील सर्व कारवाईची सूत्र एनआयएकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं पाहायला मिळालं. यातून या भागांमध्ये काही दशहतवादी हल्ल्यांमुळं प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं थेट केंद्रातून या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सदर भागात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा नायनाट करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचेही निर्देश दिले होते. 


दरम्यान एकिकडे कायदा दिवसागणिक कठोर होत असतानाच दुसरीकडे रियासी बस हल्ल्याप्रकरणी दहशतवादी गटातील एकाला ताब्यात घेण्यास पोलियांना यश आलं. उपलब्ध माहितीनुसार पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या आरोपीनं दहशतवाद्यांना अनेकदा आसरा दिला असून, त्यांना या भागातील माहिती पुरवण्याचं काम केलं होतं. 


हाकम असं या पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, त्यानं आजवर अनेकदा दहशतवाद्यांना आसरा दिल्याची खळबळजनक बाब समोर आली. हाकमनंच दहशतवाद्यांना अन्न, निवारा देत त्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास मदत केली होती.