श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या ठिथरी गावात ढगफुटीमुळे एकूण सहा जणांचा बळी गेलाय. रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढगफुटीनंतर डोडा-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलीय. रात्री २.२० मिनिटांनी ही ढगफुटी झाली. यानंतर गावातल्या मशीदजवळ राहणारं एक कुटुंब गाडलं गेलं. त्यापैंकी सहा जणांना वाचवण्यात यश आलं असून तीन जण घराच्या ढिगाऱ्यात गाडले गेल्यानं त्यांचा मृत्यू झालाय.  



एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. रहिवासीही यंत्रणांना मदत करत आहेत. जवळपासच्या भागात पाणी भरल्यानं बचाव कार्यात अडथळा येतोय.