नौगाम : जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नौगाममध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असणा-या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक भारतीय जवानाला हौतात्म्य प्राप्त झालंय. 


दुसरीकडे बारामुल्लाच्या उरीमध्येही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव हाणून पाडलाय. गेल्या छत्तीस तासात काश्मीरमध्ये अशाप्रकारे तिस-यांदा दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला.