J-K Attack : जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu Kashmir) मोठी दुर्घटना घडली आहे. पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर (National Hihgway) लष्काराच्या वाहनाला भीषण आग (Army Vehicle Caut Fire) लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जवानांचा मृत्यू झाल्याची (5 soldiers killed) माहिती आहे. ही दुर्घटना भाटादाडिया भागात घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कारातील उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्काराच्या वाहनावर हल्ला
राजौरी सेक्टरमधील भीमबेर आणि पुंछ दरम्यानवच्या महामार्गावरुन दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्काराचं वाहन जात होतं. यावेळी वाहनावर दहशतवाद्यांनी (Terrorist) अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्लाही केल्याचं बोललं जात आहे. यामुळे वाहनाला आग लागली. पाऊस आणि धुकट वातावरणाचा फायदा उचलत हा अतिरेकी हल्ला करण्यात आला. 


पाच जवान शहीद
या भागात तैनात असलेल्या अतिरेकी विरोधी पथकातल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी झालाय. जखमी जवानाला राजौरी इथल्या सेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अतिरेक्यांविरोधात परिसरा तात्काळ सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


वीज पडल्याने आग?
याआधी लष्कराच्या वाहनाला वीज पडल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण लष्करी अधिकाऱ्यांनी हा अतिरेकी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. या वाहनातून 10 ते 12 जवान प्रवास करत होते. 


PPF ने घेतली जबाबदारी
अतिरेकी संधटना पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्लाकेल्यानंतर तीन बाजूंनी फायरिंग सुरु केली. प्राथमिक माहितीनुसार चार अतिरेक्यांनी हा हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लष्करी वाहनाच्या इंधनाच्या टीकाला आग लागली. जवान लष्काराच्या वाहनातून दैनंदिन वस्तू आणि भाज्या घेऊन चौकीत परतत होते. जम्मू-काश्मिरमध्ये होणाऱ्या जी20 सम्मेलनाआधी दहशतवाद्यांनी केलेला हा सुनियोजित कट असल्याचं बोललं जात आहे. 


काय आहे PAFF?
पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजे PAFF ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संलग्न आहे. काश्मिरमधून 370 कलम हटवल्यानंतर PAFF नाव समोर आलं होतं.