श्रीनगर : ऑक्टोबर महिन्यामध्ये जम्मू काश्मीर भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे केंद्रानं सातत्यानं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा दावा केला असतानाच दुसरीकडे मात्र बिगर काश्मिरी नागरिकांच्या हत्या होण्याचं सत्र साऱ्या देशाला हादरवून सोडत आहे. (Jammu Kashmir)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सैन्यदलही या साऱ्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसत आहे. यातच आता आणखी एका गोष्टीमुळं काश्मीर खोऱ्यापासून नजीकच्य़ा भागात उलथापालथ झाल्याचं कळत आहे. ही उलथापालथ मोबाईल इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे झाली आहे. 


काश्मीरमधील ज्या भागांमद्ये इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या भागांत श्रीनगरमधील ईदगाह, कमरवारी, शौरा, एमआर गुंग, नौहट्टा, अंचार इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय कुलगाममधील वानपोह, किमोह आणि उत्तर पुलवामामध्येही मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. जवळपसा एकूण 11 ठिकाणांवर इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. 



काश्मीरमध्ये या महिन्यात अनेक सर्वसामान्य नागरिकांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये अनेक बिगर काश्मिरी नागरिकांचा निष्पाप बळी गेला आहे. हे रस्करंजित सत्र साऱ्या देशाला हादरा देदत असून, आता केंद्रीय गृहमंत्रालय यावर काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान, काश्मीरच्या घोऱ्यात अनेक नागरिकांची हत्या झाल्यामुळे तिथं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक मजुरांनी दुसऱ्या भागात स्थलांतरित होण्याला प्राधान्य दिलं आहे. रेल्वे स्थानकं आणि स्थानिक दळणवळणाच्या सोयीसुविधा यांवरही याचे परिणाम दिसून येत आहेत.