Jammu Kashmir Blast: भारताचा स्वर्ग पुन्हा हादरला, जम्मूमध्ये अर्ध्या तासात 2 शक्तीशाली बॉम्बस्फोट
जम्मू-काश्मिरच्या नरवाल भागात अवघ्या तासाच्या अंतरात दोन भीषण स्फोट झाले, यात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
Jammu Kashmir Blast News: जम्मू-काश्मिरच्या (Jammu Kashmir) नरवाल (Narwal Blast) भागात आज सकाळी दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट (twin blasts) झाले. या स्फोटात आतापर्यंत 7 जण जखमी झाल्याची माहिती जम्मू पोलिसांनी (Jammu Police) दिली आहे. तीस मिनिटांच्या अंतरात दोन बॉम्बस्फोट झाले. घटनास्थळी पोलिसांनी सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार दोन कारमध्ये हे स्फोट झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (seven people were injured in twin blast)
परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. जम्मूमधल्या ट्रान्सपोर्ट नगर वॉर्ड सातमध्ये सकाळी अकरा वाजता पहिला बॉम्ब स्फोट झाला. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटात शक्तीशाली दारुगोळा वापरण्यात आला होता.
पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नरवालमधल्या ट्रान्सपोर्ट नगर बॉम्बस्फोट करत दहशतवाद्यांना डांगरी पार्ट टू घडवून आणण्याचा कट होता. वॉर्ड नंबर 7 हा गजबजलेला भाग असतो. तसंच मोठ्याप्रमाणावर सुरक्षारक्षकांचाही बंदोबस्त असतो. त्यांना टार्गेट करण्यासाठी हा बॉम्बस्फोट घडवून आणले. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जम्मू-काश्मिर सरकारने जाहीर केली आहे.
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. लवकरच ही यात्रा काश्मिरमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.