श्रीनगर : Jammu Kashmir जम्मू- काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत सुरु असणाऱ्या एका चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत. नियंत्रण रेषेपाषी झालेल्या चकमकीत त्यांचा आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या जवानांना नजीकच्या सैन्यदल तळापाशी असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू- काश्मीर येथे नियंत्रण रेषेजवळ सतत होणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता भारतीय लष्कराकडून याचं सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडूनही दहशतवाद्यांची माहिती मिळतात तातडीने परिस्थीनुरुप कारवाई करण्यात येत आहे. 


रविवारीच सैन्यदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जम्मू- काश्मीर येथे झालेल्या चकमकीत एकूण ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. 


रविवारी, हवामान बदलाचा फायदा घेऊन काश्मीरच्या उत्तर भागात असणाऱ्या केरान सेक्टर येथून पाच दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचा खात्मा करण्यात आला. त्यापूर्वी शनिवारी कुलगाम जिल्ह्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 


 


कुलगाम येथे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं पुढीलप्रमाणे, एजाज अहमद नायको (मूसा) मुळचा कुलगामचा, शाहिद अहमद मलिक (कुलगाम), वकार फारुख (कुलगाम) आणि एम. अशरफ मलिक (सदम) मुळता अनंतनागचा.