श्रीनगर : काश्मीर घाटीत कारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कार्गिलमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान गेलेय. शुक्रवारी पारा  9.9 अंश सेलशिअस पेक्षा खाली गेलाय. कड्याक्याच्या थंडीमुळे येथे लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नळातून येणारे पाणी गोठले असून बर्फ झालाय. त्यामुळे प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. वाहणारे पाणीही गोठले आहे. तसेच येथील विजपुरवठाही खंडित झालाय. 24 तास वीज नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी नोव्हेंबरपासूनच बर्फ वृष्टी सुरू झाली आहे. येथे अजूनही थंडीचा मोसम आहे. 21 डिसेंबरपर्यंत ही थंडी कायम राहणार आहे. कार्गिल आणि लेह घाटी यांचा कश्मीरपासून संपर्क तुटला आहे. श्रीनगर - लेह मार्गावर बर्फवृष्टी झाल्याने मार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे दळवळणाची सुविधाही ठप्प आहे. हा मार्ग बंद असल्याने साधी भाजीही मिळत नाही, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिलेय. 



कारगिल आणि लेहप्रमाणे काश्मीरमधील अन्य भागात कडाक्याची थंडी पडली आहे. लेहमध्ये तापमान मायनस 5.9 तर सुंदर पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये सर्वांत कमी म्हणजे मायनस 10 डिग्री पेक्षा खाली तापमान गेलेय. येथे तापमान 10.6 नोंदविले गेले आहे. हवामान विभागाने सांगितले आहे. येथे झालेल्या बर्फवृष्टीमुळे येथील वातावरण थंड झाले आहे.



लेह - कारगिल येथील तापमान मायनस 9 ते 10 च्या जवळपास तापमानाची नोंद झाली आहे. या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कश्मीर घाटीनंतर अन्य ठिकाणी तापमानात घट झालेय. श्रीनगरमध्ये मायनस 1, पहलगाममध्ये मायनस 9.7, क़ाज़ीगुंडमध्ये मायनस 3.4, कोकरनागमध्ये मायनस 3.8 तापमानाची नोंद झालेय.