Kathua Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी हल्ले काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसून, आता आणखी एका दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरा दिला आहे. या हल्ल्यामध्ये देशसंरक्षणार्थ कर्तव्य बजावणाऱ्या पाच जवानांना प्राणाला मुकावं लागल्यानं सारा देश हळहळला आहे. (Jammu Kashmir News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमधील कठुआ इथं हा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास लष्कराच्या एका वाहनावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड आणि हायटेक बंदुकीच्या माध्यमातून भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये सुरुवातीला 6 जवान गंभीररित्या जखमी झाले. ज्यानंतर चार जवानं शहीद झाल्याचं वृत्त अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आणि या धक्क्यातून देश सावरत नाही तोच आणखी एका जवनानं प्राण गमावल्याची बातमी समोर आली. 


हेसुद्धा वाचा : Kulgam Encounter : धक्कादायक! घरातल्या कपाटात बांधलं बंकर; जम्मू काश्मीरमध्ये 'त्या' दहशतवाद्यांना कोणी दिला आसरा?


 


लष्कराच्या माहितीनुसार कठुआ जिल्ह्यातील बदनौता गावातून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर दहशवाद्यांनी हा भ्याह हल्ला केला. सूर्यांच्या माहितीनुसार हल्ला झाल्यानंतर वाहनामध्ये असणाऱ्या जवानांनी तातडीनं बाहरे येत दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला, हा संघर्ष बरात वेळ चालला. पण, दहशकवादी संधी साधत पळ काढण्यात यशस्वी ठरले. .



सदर घटनेची माहिती मिळताच लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांची राखीव तुकडी घटनास्थळी दाखल होत त्यांनी दहशतवाद्यांसाठी शोधमोहिम हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या या शोधमोहिमेमध्ये लष्कराला मात्र अपयशाचा सामना करावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार इथं असणाऱ्या दाटीवाटीच्या जंगलामुळं दहशतवाद्यांना पळ काढण्यास मदत झाली असावी, असं स्थानिकांतं म्हणणं. दरम्यान, स्थानकांपैकीच काहींनी या दहशतवाद्यांना नजरेआड होण्यास मदत केली असावी असा संशयही व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर दहशतवादी त्यांच्यासोबत मोठा शस्त्रसाठा आणि हायटेक शस्त्र घेऊन आल्याचं सांगण्यात आलं.