जम्मू : जम्मू - काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री पुँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेनं पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खरी कर्मरा भागातील भारतीय चौक्यांना टार्गेट करून हा गोळीबार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं मंगळवारी रात्री ८.३० वाजता गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार जवळपास अर्ध्या तासांपर्यंत सुरूच होता. भारतीय सेनेनंही त्याला प्रत्यूत्तर म्हणून गोळीबार केला. 


तब्बल १० दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शांततेचं उल्लंघन केलं. यापूर्वी १८ मार्च रोजी पूँछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरच्या रहिवासी भागात पाकिस्ताननं केलेल्या स्फोटात एका कुटुंबातील पाच सदस्यांनी आपला जीव गमावला होता... तर दोन जण जखमी झाले होते.