श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांनी 3 IED आणि 3 स्टिक बॉम्ब जप्त केले आहेत. सुरक्षा दलांनी जैशचा दहशतवादी झाकीर हुसेन भट याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या भागात छापा टाकला, जिथे हे स्फोटक जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांकडून अजूनही परिसरात शोध मोहीम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाची माहिती देताना एडीजीपी जम्मू मुकेश सिंह यांनी सांगितले की, सुरक्षा दलातील ही कारवाई जैशचा दहशतवादी झाकीर हुसैन भट्टच्या चौकशीनंतर करण्यात आली आहे. उधमपूर स्फोटानंतर सतर्क झालेल्या जिल्हा पोलिसांनी मालाड, बिल्लावरचा रहिवासी झाकीर याला पकडले होते.


संशयास्पद फुगा जप्त


याशिवाय पोलिसांनी कठुआ परिसरात सीमेजवळ संशयास्पद फुगा जप्त केला आहे. या फुग्यावर पाकिस्तानच्या समर्थनाचा नारा लिहिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फुग्यावर 'आय लव्ह पाकिस्तान' असे लिहिले होते. पोलिसांनी हा फुगा ताब्यात घेतला आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा या फुग्याच्या तपासात गुंतल्या आहेत.


कोण आहे दहशतवादी झाकीर?


जैशचा दहशतवादी झाकीर सोशल मीडिया अॅप्सच्या मदतीने पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैशच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याच्याकडून आयईडी जप्त करण्यात आला. तो खोऱ्यात मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही एका प्रकरणात तो दोषी आहे. तो 14 वर्षे कोट भालवाल कारागृहात होता आणि 2019 मध्ये त्याची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा दहशतवादी कारस्थानांमध्ये अडकू लागला.