जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग, द्रास, कारगिल, पहलगाम आणि गुलमर्गमध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झालेत.
ही हिमवृष्टी थांबल्यानंतरच बर्फ बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तिकडे हिमाचल प्रदेशही हिमवृष्टी होतेय. कल्पा, चितकुल, लाहौल स्पिती या भागात सर्वाधिक हिमवृष्टी झालीय. उत्तराखंडच्या यमुनोत्रीमध्येही बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पाहायला मिळत असून यामुळे पर्यटकही आनंदलेत.