मुंबई : आपली स्वत:ची कार असणं असं प्रत्येकाला वाटतं. पण आज लाखो लोकांकडे स्वत:ची गाडी आहे. पण भारतात एक काळ असा होता जेव्हा कोणाकडेच स्वत:ची कार असणं खूप क्वचित होतं. भारतात आज कारचं मार्केट खूप मोठं आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की देशात पहिल्यांदा कुठे कार विकली गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कलकत्ता येथे पहिली कार विकली गेली होती. देशातील पहिल्या कारचा इतिहास 1897 चा आहे. तेव्हा कलकत्त्यावर 1911 पर्यंत ब्रिटीश राजवट होती. 1897 च्या वेळी हे शहर व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात महत्त्वाचं शहर होतं. हेच कारण होते की जेव्हा भारतीय बाजारपेठेत कार पहिल्यांदा लॉन्च केली गेली तेव्हा ती या शहरात झाली. एवढेच नाही तर देशातील पहिली कार खरेदी करण्याचे कामही याच शहरातील एका उद्योगपतीने केले.


ही कार बहुधा फ्रान्सची डीडियन असावी. जेव्हा त्याच्या लॉन्चिंगची जाहिरात छापली गेली तेव्हा कलकत्त्यात लोक वेडे झाले. त्या काळातील वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, देशातील पहिली कार कलकत्ता येथे विकली गेली असावी, परंतु काही काळानंतर मुंबईत आणखी 4 कार विकल्या गेल्या. ज्या लोकांनी या चार गाड्या घेतल्या होत्या ते पारशी समाजातील होते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे देखील मुंबईत या गाड्या खरेदी करणाऱ्या 4 खरेदीदारांमध्ये होते. मद्रास या नंतरचे दुसरे मोठे शहर जेथे 1901 मध्ये पहिली कार आली होती.


1907 पर्यंत, कार कलकत्त्याच्या संस्कृतीचा एक भाग बनू लागल्या. या गाड्यांचे खरेदीदार त्या काळातील मोठे जमीनदार होते. सर्वसामान्यांमध्ये पैसा आणि स्टेटसची ताकद दाखवण्यासाठी अनेक गाड्या विकत घेतल्या. त्या काळातील अनेक परदेशी कंपन्यांनी आपल्या गाड्या भारतीय बाजारपेठेत आणल्या, पण सर्वात मोठी मागणी Lanchesters आणि Ford Model T ला होती. काही ठिकाणी पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपूर्वी देशात 1,000 हून अधिक कार विकल्या गेल्याची आकडेवारी आढळते.