Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) हे सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी सकाळी दिल्लीच्या (Delhi) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) फुमियो किशिदा यांचे आगमन झाले. जपानचे पंतप्रधान दिल्लीत पोहोचताच आयजीआय विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे स्वागत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्या स्वागतावेळी मराठमोळी लावणी लावण्यात आली होती. वाजले की बारा या लावणीवर नाचणाऱ्या मुलींना पाहून त्यांचे नृत्य पाहण्याचा मोह जपानच्या पंतप्रधानांनाही आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित होते. किशिदा यांनी काही वेळ थांबून लावणी नृत्य पाहिले.




पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता जपानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. इंडो पॅसिफिकसह अनेक मुद्द्यांवर चर्चा दोघांमध्ये चर्चा होणार आहे. या भेटीत, किशिदा मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आपल्या योजनेबाबत माहिती देऊ शकतात. चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हानांवर मोदी आणि किशिदा यांच्यात चर्चा होऊ शकते. यादरम्यान दोन्ही नेते मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी आपली भूमिका स्पष्ट करतील.


प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी), दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवर चिनी आक्रमकतेचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित होऊ शकतो. तैवानच्या आखातात शांतता आणि स्थैर्याच्या गरजेवर जपाननेही आवाज उठवला आहे. किशिदा आणि नरेंद्र मोदी भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये समान हितसंबंधांशी संबंधित द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली जाईल.