बारमर: राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला शनिवारी मोठा धक्का बसला. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पूत्र खासदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. बारमर येथील जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत अनेक 'गौरव' आणि 'संकल्प' सभा झाल्या. मात्र, आजची सभा ही स्वाभिमानासाठी आहे. स्वाभिमान हा आपला हक्क आहे आणि त्यासोबत आपण कटिबद्ध आहोत, असे मानवेंद्र सिंह यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजपाची साथ देणे ही आमची मोठी चूक असल्याचेही सांगितले. 


मी आता भाजपाचा सदस्य नाही. काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. माझ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. ते जे सांगतील तेच मी करणार आहे. त्यांचा निर्णय हा माझा निर्णय असेल त्यासाठी प्रत्येकाचे मत जाणून घेणार आहे, असे मानवेंद्र सिंह यांनी सांगितले.