नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांचेच पुत्र मोदी सरकारचा बचाव करण्यासाठी पूढे आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंत सिन्हा यांनी बुधवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर टीका केली होती. मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखंचं असल्याचं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं होतं.


यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यांचेच पुत्र आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिलेत.


यशवंत सिन्हा यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, आम्ही नवी अर्थव्यवस्था तयार करत आहोत. नवी अर्थव्यवस्था नव्या भारतासाठी आहे आणि त्याचा फायदा येत्या काळात तुम्हाला नक्कीच दिसेल.


नवी अर्थव्यवस्था पारदर्शक आहे आणि यामुळे लाखो लोकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजीटल पेंमेटमुळं देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे असेही जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.