पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींना मिळालं या पहिल्या पक्षाचं समर्थन
या पक्षाने दिलं राहुल गांधींना पहिलं समर्थन
नवी दिल्ली : रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमेटीची बैठक झाली. यामध्ये मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी सोनिया गांधी आणि पी चिदंबरम यांनी महाआघाडीवर जोर दिला. या बैठकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्यासाठी देखील काँग्रेसकडून प्रयत्न झाले. आज एचडी देवगौडा यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे.
देवगौडा यांनी म्हटलं की, कुमारस्वामी यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे की, ते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतात. त्यामुळे याबाबत कोणतीही शंका नको. महाआघाडीमध्ये आणखी काही प्रादेशिक पक्षांना यावं लागेल त्याशिवाय काँग्रेसला हे शक्य होणार नाही. इतर पक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पंसती देतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
टीएमसीच्या प्रमुख ममता बनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पंतप्रधानपदाबाबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही गोष्ट इतकी सोपी देखील नसणार आहे.