पटना : बिहारमध्ये जेडीयूने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. जेडीयूने विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट देण्याबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे. जेडीयूने 10 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यात एका मंत्र्याचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री कपिल देव कामत यांचे तिकीट पक्षाने कापले असून त्यांच्या सूनेला जेडीयूने संधी दिली आहे. जीरादेईचे रमेशसिंह कुशवाह, राजगीरचे रवी ज्योती तर एकमाचे आमदार धुमल सिंह यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देण्यात आलं आहे.


त्याचबरोबर वैशालीचे आमदार राजकिशोर सिंह, डुमरांवचे आमदार ददन पहलवान, फुलपरासचे आमदार गुलजार देवी, सुलतानगंजचे आमदार सुबोध राय, बेनीपूरचे सुनील चौधरी, अमरपूरचे जनार्दन मांझी यांच्या ऐवजी त्यांच्या मुलांना तिकीट देण्यात आलं आहे.


जेडीयूने मागासलेल्या आणि अतिमागासलेल्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी 115 पैकी 67 उमेदवार मागास व मागासवर्गीय व्यक्तींना तिकीट दिले आहे. जेडीयूने अत्यंत मागासलेल्या 27 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मागास प्रवर्गातील 40 लोकांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय दोन मंत्र्यांचे मतदारसंघ ही बदलण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री कृष्णनंदन वर्मा जहानाबादहून लढणार आहेत, तर अन्न पुरवठामंत्री मदन सहनी यांना बहादूरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.