नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर ब्रेक लागला आहे. लॉकडाऊनमुळे जेईई एडवांसची परीक्षा ही झालेली नाही. त्यामुळे आता २३ ऑगस्टला जेईई एडवांस परीक्षा होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नीट आणि जेईई मेन सारख्या परीक्षा देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ५ मेला (NEET)ची परीक्षा २६ जुलैला होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर (JEE) Mains परीक्षा १८ जुलै ते २३ जुलैच्या दरम्यान होणार आहे. JEE Advance परीक्षा आता ऑगस्टमध्ये होणार आहे. 



डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती. ट्व‍िटरवर #EducationMinisterGoesLive हॅशटॅग सह विद्यार्थ्यांनी त्यांना पडलेले अनेक प्रश्न थेट त्यांना विचारले होते. यानंतर त्यांनी मेडिकल इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा आणि इंजीनियरिंगसाठी महत्त्वाची असलेली JEE Mains परीक्षांच्या तारखेची घोषणा केली होती.


कोरोनामुळे NTA ने नीट यूजी 2020 (NEET UG 2020) आणि जेईई मेन 2 (JEE Main 2) मध्ये पहिल्यांदा काही प्रमाणात दिलासा दिला आहे. परीक्षेसाठी ज्यांना शहर बदलायचं असेल तर ते विद्यार्थी परीक्षा देण्यासाठीचं शहर बदलू शकणार आहेत.