नवी दिल्ली  :  एकदा विमानात बसल्यावर आपण गंतव्य स्थानी पोहोचू असा विश्वास प्रवाशांना असतो. पण उड्डाण केल्यानंतर आकाशामार्गे विमान पुन्हा आहे त्याच जागेवर आले तर ? हो अशीच काहीशी घटना नवी दिल्ली येथे समोर आली आहे. त्यामूळे प्रवाशांना संताप अनावर झाला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे.


प्रवाशांचा गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेट एअरवेजच्या दिल्ली-पाटणा फ्लाईट क्र. 9W730 या विमानाने आपल्या नियोजित वेळेत दिल्ली विमानतळातून आकाशात उड्डाण केले. प्रवासीही निश्चिंत होते. पण काही वेळाने जेव्हा विमान उतरले तेव्हा दिल्ली विमानतळच समोर दिसल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. 


धावपट्टी उपलब्ध नव्हती


जेट एअरवेजच्या दिल्ली-पाटणा विमान बिहारची राजधानी पाटणामध्ये उतरणार होते. यासंबंधी एअरवेजकडून माहिती देण्यात आली. विमानाला विमानतळावर उतरवण्यासाठी धावपट्टी उपलब्ध नसल्याने लँड करण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे एअरवेजकडून सांगण्यात आले.  


पाटनाऐवजी वाराणसी


पाटना येथे विमान उतरविण्याऐवजी वाराणसीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 



चौकशी होणार


मात्र विमान वाराणसीला जाण्याऐवजी दिल्लीमध्येच रिटर्न आल्याने प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. याप्रकरणी विमान कंपनी, एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पाटणा विमानतळाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.