जेट एअरवेजच्या प्रवाशाने मागितली 30 लाखाची भरपाई
मागणी पूर्ण न झाल्यास घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा इशारा
मुंबई : मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या उड्डाणादरम्यान चालक दलातर्फे 'केबिन प्रेशर' नियंत्रित न केल्याने प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त वाहून अनेक प्रवासी आजारी पडले होते. यातील एका प्रवाशाने जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी केली आहे. यासोबतच 100 अपग्रेड वाऊचरदेखील मागितले आहेत. एअरलाईन्सवर लक्ष न ठेवल्याचा आरोप चालक दलावर केलायं. मागणी पूर्ण न झाल्यास घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा इशाराही त्याने दिलाय.
जेट एअरवेजने प्रवाशांकडे लक्ष दिले नाही. यासोबतच 100 इकोनॉमी क्लास तिकिटाला बिझनेस क्लास तिकीटात अपग्रेड करत 30 लाखाची भरपाई मागितली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्यास एअरलाईन्स त्यांना भरपाई देते.
पुन्हा मुंबईकडे
केबिन क्रूने बेजबाबदारपणे 'ब्लिड स्विच' सुरू न केल्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. विमानात हवेचा योग्य दाब राखण्यात अपयश आल्यामुळे ऑक्सिजन मास्क बाहेर आले. मुंबईहून पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांनी या विमानानं जयपूरला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं. सिल्वासापर्यंत गेलेलं विमान या प्रकारामुळे पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं. विमानात १६६ प्रवासी होते. त्यातल्या ३० जणांच्या नाकातून रक्त वाहू लागले. काही जणांच्या कानातून रक्त येत होते, तर काही प्रवाशांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक प्रवाशांच्या नाकातून रक्त, अनेकांना डोकेदुखीचा त्रास झाला.
एमर्जन्सी लॅन्डींग
फ्लाईट 9W-697 चं एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं. केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी असलेल्या 'ब्लिड स्विच'ला सुरू करणं क्रू मेम्बर्स विसरले. या विमानातून 166 प्रवासी उपस्थित होते. त्यातील 30 जणांच्या काना-नाकातून रक्त यायला सुरुवात झाली. त्यानंतर उडालेल्या गोंधळात सिल्वासापर्यंत पोहचलेलं विमान पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशांना मुंबई एअरपोर्ट उपचार उपलब्ध करून देण्यात आले.