ऑन ड्यूटी असताना वैमानिकांची विमानात मारामारी, गमावली नोकरी
खासगी क्षेत्रातील विमानकंपनी जेट एअरवेजने दोन वैमानिकांना जोरदार दणका दिला आहे. या दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यान हवेत असलेल्या विमानात भांडणे केली. त्यामुळे या वैमानिकांवर कडक कारवाई करत प्रशासनाने दोघांनाही नोकरीवरून काढून टाकले आहे.
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील विमानकंपनी जेट एअरवेजने दोन वैमानिकांना जोरदार दणका दिला आहे. या दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यान हवेत असलेल्या विमानात भांडणे केली. त्यामुळे या वैमानिकांवर कडक कारवाई करत प्रशासनाने दोघांनाही नोकरीवरून काढून टाकले आहे.
महिला कमांडरला लगावली थप्पड
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही वैमानीक एक जानेवारी या दिवशी लंडन ते मुंबई उड्डाण घेतलेल्या विमानात कर्तव्यावर होते. प्रवासादरम्यान काही कारणांवर दोघांमध्ये मतभेद झाले. दरम्यान, दोघांपैकी एका वरिष्ठ वैमानिकाने विमान उड्डानादरम्यान, एका महिला कंमांडरला थप्पड लगावली. या घटनेनेतर एअरलाईन्सने दोघाही वैमानिकांना नोकरीवरून कमी केले आहे.
प्रकरणाची चौकशी करून घेतला निर्णय
जेट एअरवेजचे प्रवक्ता दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, एक जानेवारी 2018ला लंडन येथून मुंबईसाठी उड्डाण घेतलेल्या ९ डब्ल्यू ११९ या विमानात ही घटना घडली. घडल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यावर जेट एअरवेजने दोन्ही कॉकपीट क्रू सदस्यांची सेवा तत्काळ थांबवत त्यांना नोकरीवरून कमी केले.
पविमानक्षेत्राच्या नियामक नागरिक उड्डान महानिदेशक (डीजीसीए) ने या प्रकरणात पहिल्यांदा पुरूष पायलटचा विमानउड्डानाचा परवाना निलंबीत केला. त्यापूर्वी कंपनी प्रवक्त्याने सांगितले होते की, विमानातील क्रू मेंबर्समध्ये काही कारणांवरून गैरसमज झाला होता. मात्र, त्यावर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यात आला होता.