मुंबई : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामुळे सोन्यावर परिणाम झाला आहे. सगळे सोनार आपला स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहे. सामान्य बाजारात सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. याचा फायदा आता लग्न सराई असताना जनसामान्यांना होणार आहे. 


मागणी कमी झाल्यामुळे सोन्यावर डिस्काऊंट 


पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे ज्वेलर्स आणि सोने खरेदी करणारे सतर्क झाले आहेत. याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर पडला आहे. सोन्याचा दर आता कमी झाला आहे. 


1 दिवसांत 41 रुपये सोन्याचा दर कमी 


पीएनबीमुळे सोन्यावर परिणाम झाला. एका दिवसांत 41 रुपयांनी सोन्याचा दर कमी झाला आहे. 18 फेब्रुवारी रोजी सोनं 31,666 रुपये होतं. आता सोन्याचा दर 31,625 रुपयाने कमी झालं आहे. हा दर 24 कॅरेट  दरातील सोन्याचा दरात फरक पाहायला मिळत आहे. 


का झाले दर कमी 


पीएनबी घोटाळ्यातनंतर आता ज्वेलर्सवर अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. त्यामुळे ज्वेलर्सचे खाते तपासले जात आहेत. तसेच खरेदी विक्रीवर देखील त्यांची नजक आहे.