कानपूर : एका महिलेने दागिने गच्चीवर वाळत ठेवले होते, दागिने अनेक दिवसांपासून पेटीत बंद होते, या दागिन्यांना बाहेरची हवा लागावी. यासाठी तिने हे दागिने गच्चीवर सुकवायला ठेवले, आणि यानंतर ती आपल्या कामात गुंग झाली. पाऊण तासानंतर बाहेरची हवा लागण्यासाठी ठेवलेले दागिने लंपास झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरसिंग सचान यांची पत्नी सुमन हीने दागिन्यांची पेटी उघडली, आणि दागिन्यांच्या पेटीत तिला किडे दिसले. किडे निघून जावेत म्हणून तिने उन्हात हे दागिने पेटीसह ठेवले. तिने दागिने प्लॅस्टीकच्या पिशवीत गुंडाळून पेटीत ठेवले होते. ही पिशवी तिने बाहेर काढली आणि आतले दागिने पसरून ठेवले जेणेकरून त्यातले किडे निघून जाऊ शकतात.


यानंतर ती महत्वाच्या कामात गुंग होती, म्हणजेच शेजाऱ्यांबरोबर गप्पा मारायला गेली. दुपारी ३ वाजता सोसाट्याचा वारा सुटल्याने गच्चीत घातलेले कपडे खाली पडले होते. ते गोळा करण्यासाठी सुमन जेव्हा वर गेली, तेव्हा ५ लाखांचे दागिने पिशवीसकट गायब झालेले होते. मात्र, काही जणांचं म्हणणं आहे की. या महिलेचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. त्यामुळे तिने गच्चीमध्ये दागिने सुकत घातले.