रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीवर असताना आरजेडी नेता तेजस्वी यादव महाआघाडीला विजय मिळेल असा दावा केला आहे. त्यांनी भाजप सरकार असूनही झारखंड गरीब राज्य राहिल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप सरकार असूनही झारखंडला बेरोजगार, भ्रष्टाचार सारखे प्रश्न सतावत होते. या प्रश्नांनी झारखंडचे नागरिक हैराण झाले आहे. आम्हाला मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडी मिळत असून हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 



'झारखंड हा आदिवासी भाग आहे. अजूनही इथे लोकं मागासलेले आहेत. बेरोजगारी असल्यामुळे ते पलायन करत आहेत. भ्रष्टाचार, कायद्याचा दुरूपयोग यामुळे लोकं पळून जात आहेत. मतदारांनी अतिशय मोकळेपणाने महाआघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक फेऱ्यांमध्ये आमच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर महाआघाडीला क्लिन स्वीप मिळाल्याच,' तेजस्वी यादव म्हणाले आहेत. 


झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालातील महत्वाचे मुद्दे


- बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएम आणि सुदेश महतो यांच्या एजेएस पक्षाला किती जागा मिळतात याकडे लक्ष असेल.
- भाजप आणि एजेएस यांची युती तुटल्याचा फटका भाजपला बसेल का हे देखील स्पष्ट होणार आहे.
- या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसत आहे.
- २०१४ च्या निवडणूकीत भाजपला ३७ तर झारखंड मुक्ती मोर्चा १९ आणि काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज एक्झीट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.