नवी दिल्ली : लग्नसोहळ्यानंतर रस्त्याच्या कडेला आयोजित पूजा करताना एक भीषण अपघात झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. झारखंडमधील चाईबासा-चक्रधरपूर मार्गावर हा अपघात झालाय. 


मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आयोजित पूजा करत असताना एका भरधाव वेगाने आलेल्या गाडीने नागरिकांना धडक दिली. 


यानंतर आरोपी कार चालकाने गाडीचा स्पीड वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळावरुन पळून जाण्यात त्याला यश आलं नाही. तेथे उपस्थित नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केलं. तर, आरोपीला पोलीस वाचवत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


हाटगम्हरिया आणि गोईलकेरा येथील दोन आदिवासी परिवार लग्नाची विधी पूर्ण करुन बोरदा पूल परिसरात पूजा करत होते. या विधीसाठी जवळपास २० नागरिक उपस्तित होते. त्याच दरम्यान भरधाव वेगाने कार आली आणि त्यांना धडक दिली. 


या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालाय तर, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरीता जमशेदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.