प्रत्येक दलिताला 5 एकर जमिनीची मागणी
गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.
हैदराबाद : गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.
दलितांसाठी जमिनीची मागणी
70 टक्के दलित भूमिहीन आहेत. त्यामुळे प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली पाहिजे', अशी मागणी गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केली आहे. तुरुंगात असलेले दलित नेते मंदा कृष्ण मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी ही मागणी केली.
नवी आघाडी उभी करणार
'दलितांच्या उद्धारासाठी समविचारी नेते एकत्र येणार असून देशव्यापी आघाडी उभी करणार असल्याचं मेवानींनी सांगितलं आहे. अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे मडिगा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रत्येक दलिताला 3 एकर जमीन
"जमीन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गुजरातमध्ये प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली जावी. तर प्रत्येक दलिताला तीन एकर जमीन द्यावी अशी मडिगा यांची मागणी आहे. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही दलितांसाठी देशव्यापी आघाडी उभी करणार आहोत. यात माझ्यासह मडिगा आणि इतर पुरोगामी, दलित नेते सहभागी होणार आहेत. असं मेवानींनी म्हटलं आहे.
मडिगांच्या अटकेचा निषेध
मडिगा यांच्या अटकेचा मेवानी यांनी निषेध केला. 'तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मडिगा यांची सुटका करावी. मडिगा हे त्यांच्या समूहाच्या घटनात्मक हक्कांसाठी झगडत आहेत. एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अशी गदा आणू नये' असे मेवानी यांनी म्हटलं आहे.