मुंबई :मुंबई : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांची गरज ओळखून आणि प्रतिस्पर्धांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे प्लान आणत असते. सध्या जिओचे प्लॅन वाढले आहेत. पण ग्राहकांनी जिओकडून दुसऱ्या ब्रँण्डकडे जाऊ नये यासाठी कंपनी वेगवेगळ्या सुविधा त्यांना देत आहे. नुकतंच कंपनीकडून खास प्लॅन देण्यात आला आहे. यामध्ये 3 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन फुकट मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या प्लानचा फायदा घेता येणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री मिळू शकतं. रिलायन्स जिओच्या या प्लॅन्ससह, तुम्हाला  OTTचे फायदेच मिळणार आहेत. 


यासोबत डेटा आणि कॉलिंगचे फायदेही मिळतील हे कंपनीचे पोस्टपेड प्लॅन आहेत. म्हणजेच यासाठी तुम्हाला महिन्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. जर तुम्ही प्रीपेड वापरत असाल आणि तुम्हाला पोस्टपेडमध्ये जायचं असेल तर तुम्ही हे प्लॅन नक्की घेऊ शकता. 


399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला हायस्पीड डेटा 75 GB महिन्यासाठी मिळणार आहे. त्यासोबत कॉलिंग आणि SMS सुविधा असेल. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर 10 GB साठी वापरण्यात येणारा चार्ज लावण्यात येईल. 200 GB रोलओव्हर देण्यात येतो. 


या प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime Video, Disney+Hotstar आणि Netflix या App चं सब्सक्रिप्शन फुकटात मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त पैसे आकारावे लागणार नाहीत. 


599 चा पोस्टपेड प्लान आहे. ज्यामध्ये ग्राहकांना Amazon Prime Video, Disney+Hotstar आणि Netflix या App चं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यासोबत 100GB, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सुविधा मिळणार आहे. तुमचा डेटा संपल्यावर 10 रुपये प्रत्येक GB साठी वेगळे आकारण्यात येतील.