मुकेश अंबानींच्या Jio Cloud ला Google Drive देणार टक्कर? कुणाची सर्विस सर्वात बेस्ट
JioCloud VS Google Drive: मोबाइल आणि मोबाइलमधील डेटा हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. तो कुठेतरी व्यवस्थीत ठेवणे गरजेचे असते. अशावेळी काय सुरक्षित आहे JioCloud की Google Drive.
Jio Cloud : हल्ली सगळेचजण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा डेटा मोबाइलमध्ये ठेवले जातात. मग ते डॉक्युमेंट्स असो किंवा फोटो, व्हिडीओ. पण तुम्हाला कधी प्रश्न पडतो की, मोबाइल फोन खराब झाला किंवा हा डेटा खराब झाला तर. अशावेळी अनेकजण हा डेटा क्लाऊडवर सेव्ह केला जातो. JioCloud आणि Google Drive यामध्ये सर्वात बेस्ट काय आहे?
क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय?
हे एक ऑनलाइन स्टोरेज आहे जिथे तुम्ही तुमच्या फोनचा डेटा इंटरनेटद्वारे सुरक्षित ठेवू शकता. फोनचे मोठे आणि सुरक्षित मेमरी कार्ड म्हणून याकडे पाहिलं जातं. Google Drive आणि Apple iCloud सारख्या अनेक क्लाउड स्टोरेज कंपन्या आहेत. आता Reliance Jio ने JioCloud नावाने आपली क्लाउड स्टोरेज सेवा देखील लॉन्च केली आहे.
Jio Cloud काय आहे?
जिओ नेटवर्क युझर्स जिओ क्लाऊड एक क्लाऊड स्टोरेज सर्विस आहे. प्रत्येक रिचार्जसोबत ग्राहकांना 5GN फ्री स्पेस मिळणार आहे. जेथे तुम्ही फोटो, व्हिडीओ, गाणी किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सेव्ह करु शकता. दिवळानंतर जिओ AI क्लाऊज वेलकम ऑफरसोबत 100 GB फ्री स्पेस देणार आहेत. गुगल ड्राइव्हच्या 100GB प्लानकरिता ग्राहकांना वर्षाला 1300 रुपये द्यावे लागतील.
Jio Cloud चा कसा कराल वापर?
जियोक्लाऊड ऍप एंड्रॉयड, ios, विंडोज, मॅक आणि जियोफोनसाठी आहे. ग्राहक यासाठी ऍप डाऊनलोड करु शकतात. Jiocloud.com वेबसाइटचा देखील वापर करु शकतात.
Jio Cloud चा कसा करावा वापर?
गुगल ड्राइव्हचा वापर करताना जिओ क्लाऊड वापरणे सोपे आहे. आता फ्रीमध्ये फक्त 5GB स्पेस मिळणार आहे. मित्रांना देऊन हे 15GB पर्यंत वाढवू शकता. जिओक्लाउड ऍपमध्ये फाइल फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट वेगवेगळे ठेवू शकता. या फाइल्स तुम्ही दुसऱ्या जिओक्लाउड युझर्ससोबत शेअर करु शकता.
यामध्ये ऑफलाइन फाइल्सकरता फोल्डर देखील आहे. ज्यामध्ये इंटरनेटशिवाय जियोक्लाऊडवर ठेवलेल्या फाइल्स पाहू शकता. सोबतच यामधील आवडत्या फाइल्सला तुम्ही फेव्हरेट मार्क करु शकता. जर एखादे डॉक्युमेंट स्कॅन करायचे असेल तर ते जिओक्लाऊडवरील बिल्ट इन स्कॅनरचा वापर करु शकता. यामध्ये तुम्ही प्रायव्हेट फोल्डर देखील तयार करु शकता. तसेच पासवर्ड देखील ठवू शकता. महत्त्वाचं म्हणजे जिओक्लाउडवर डिलिट केलेली फाइल्स थोड्यावेळासाठी ट्रॅशवर राहते. ज्याचा तुम्ही पुन्हा वापर करु शकता.
Jiocloud-Goodle Drive मध्ये सर्वात बेस्ट काय?
सध्या Google Drive 15GB स्पेस आहे जी JioCloud पेक्षा जास्त आहे. पण Jio ची 100GB AI क्लाउड वेलकम ऑफर देत आहे. जर तुम्ही दररोज डॉक्युमेंट एडिटिंग सर्विसचा वापर करु शकता. Google शीट्स आणि डॉक्स सारख्या गोष्टींसाठी Google ड्राइव्ह हा एक चांगला पर्याय आहे.