श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्याता बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवांदी यांच्या दरम्यान चकमक झाली. यामध्ये काश्मीरचे पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभागी आणखी एक दहशतवादी नावीद जट्ट याला सुरक्षा दलानं ठार केलंय. नावीद जट्ट दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आहे. यापूर्वी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी या दहशतवाद्याची ओळख आझाद अहमज मलिक उर्फ आझाद डाडा म्हणून केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द रायजिंद काश्मीर'चे मुख्य संपादक शुजात बुखारी यांची १४ जून रोजी श्रीनगरच्या प्रेस एन्क्लेव्ह भागात तीन बाईकस्वारांनी गोळ्या घालून हत्या केली होती. 


पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं बडगामच्या कठपोरा भागाला घेराव घातला. 


यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानं याच्या प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरू झाली. खबरदारी म्हणून प्रशासनानं बडगाममधील इंटरनेट सेवा बंद केल्यात.